मुंबई- केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेत राहून नेहमी विरोधकांच्या भूमिकेतून सरकारवर टीका करणार्या शिवसेनेच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची की नाही यासाठी भाजपने शिवसेनेला अल्टीमेटम दिला आहे.
भाजपने ३१ जानेवारीपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना
विचार करून आपला निर्णय कळवण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. भाजपाध्यक्ष अमित
शहा यांनी शिवसेनेच्या अवास्तव मागण्या मान्य करण्यासाठी पक्ष झुकणार नसल्याचे
म्हटले आहे.